दिग्रसमध्ये रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:52+5:302021-07-10T04:28:52+5:30

पंचायत समिती सभापती अनिता राठोड, नायब तहसीलदार व्ही.जी. इंगोले, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा बानोत, ...

Spontaneous response to blood donation Mahayagya in Digras | दिग्रसमध्ये रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिग्रसमध्ये रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

पंचायत समिती सभापती अनिता राठोड, नायब तहसीलदार व्ही.जी. इंगोले, गटविकास अधिकारी रमेश खारोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा बानोत, डॉ. नयन शेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीचे समाजसेवा अधिकारी डॉ. आशिष खडसे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून व दिवंगत जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले.

आमदार संजय राठोड, शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठक्कर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य केतन रत्नपारखी, बांधकाम सभापती नूर मुहम्मद खान, सुधीर देशमुख, अमिन आदींनी शिबिराला भेट दिली. लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रकाश सातघरे, डॉ. श्रीकृष्ण खोलगडे, पी.पी. पप्पूवाले, सुरेश चिरडे, अब्दुल रफीक शेख, ऋषीकेश हिरास, अबझल खान, लक्षवेध क्रीडा अकॅडमीचे सुरेंद्र राठोड, राम राठोड, जय राठोड, सचिन मेश्राम, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सोनाली जक्कलवार, केशीराज मांडवकर, प्रदीप वाघमारे, रामदास आगलावे, आदर्श खडक्कर, दानिश शेख, महेश मिश्रा, गौरांग दुधे, आदर्श खोडे आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मजहर अहेमद खान, प्रास्ताविक डॉ. प्रदीप मेहता, तर विष्णुपंत यादव यांनी आभार मानले.

बॉक्स

शिबिराला यांची लाभली साथ

विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे शिक्षक अतित इंगळे, पूनम धानुनकर, अभय तोटे, निवृत्ती धोडरे, हेमंत दुबे, चंद्रकात कोरे, अमित वानखडे, स्वप्नील ढेपाळे, विकास कोतवाल, श्रीनिवास देशपांडे आदींनी सहकार्य केले.

किरण मोरे, सौरभ मनवर, राहुल परांडे, शुभम सातघरे, रूपेश सारफळे, मुकेश पवार, जित घाटगे आदींनी रक्तदान केले.

Web Title: Spontaneous response to blood donation Mahayagya in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.