घाटंजीत गीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:40 AM2021-05-16T04:40:23+5:302021-05-16T04:40:23+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणेच मुलांमध्ये हताशपणा, नैराश्य आले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना थोडे सकारात्मक होता ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणेच मुलांमध्ये हताशपणा, नैराश्य आले आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना थोडे सकारात्मक होता यावे, त्यांचे मन प्रफुल्लित व्हावे, उत्साह वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दोन गटात झाली.
पहिल्या गटात प्रथम मुरली येथील कन्हय्या विकास भोयर याने १००१ रुपयांचे बक्षीस मिळविले. द्वितीय क्रमांक शरयू गजानन डोईफोडे हिने पटकाविला. तिला ७०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. तिसरा क्रमांक देवश्री विजेंद्र वडेश्वर हिला मिळाला. तिला ५०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस नेहरा विशाल भोयर, अनन्या प्रशांत गवळी यांना मिळाले. गट क्रमांक २ मधून प्रथम वैष्णवी प्रवीण कर्णेवार, द्वितीय साक्षी संतोष वानखडे, तृतीय क्रमांक अजय चव्हाण यांना मिळाला. त्यांना अनुक्रमे १००१, ७०१ आणि ५०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस प्रांजली संतोष देउळकर व वैष्णवी सुभाष देवळे यांना मिळाले. परीक्षण भाऊ ताटेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी संगीता भुरे, वर्षा गुजलवार, पूजा उत्तरवार, रश्मी ठाकरे व संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.