व्यापाऱ्यांच्या भारत बंदला यवतमाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:53 PM2021-02-26T13:53:13+5:302021-02-26T13:53:44+5:30

Yawatmal News मालाचे उत्पादन करणाऱयांवर एक रकमी कर लावावा अश्या अन्य विविध मागण्यांसाठी व्यापाऱयांनी शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त केला.

Spontaneous response of traders at Bharat Bandla Yavatmal | व्यापाऱ्यांच्या भारत बंदला यवतमाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यापाऱ्यांच्या भारत बंदला यवतमाळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यातील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क   
यवतमाळ :  जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्या,  जीएसटी कायद्यात रोज नवनवीन दुरुस्त्या होतात यामुळे व्यापारी  वर्ग हा त्रस्त आहे,  सुटटसुटीत करप्रणाली आणावी, मालाचे उत्पादन करणाऱयांवर एक रकमी कर लावावा अश्या अन्य विविध मागण्यांसाठी व्यापाऱयांनी शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त केला.  व्यापाऱ्याच्या या बंदला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.

व्यापाऱ्याच्या मागणीत सर्वात मुख्य मुद्दा की व्यापाऱ्याना रिटर्न भरण्याची संधीच नाही. मानवी चुकांमुळे  चुकून भरलेल्या रिटर्न मध्ये काही त्रुटी राहिली तर व्यापाऱ्याना दंड भरावा लागतो .या जाचक अटीमुळे व्यापारी,  चार्टड अकौंटंटमध्ये सर्वात जास्त रोष व्याप्त आहे. सरकाराने  यावर लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी व्यापारी करत आहे 

Web Title: Spontaneous response of traders at Bharat Bandla Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.