‘वायपीपीएस’मध्ये स्पोर्टस् मीट उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:39 PM2019-02-04T21:39:27+5:302019-02-04T21:39:46+5:30
चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘स्पोर्टस् मीट’ उत्साहात पार पडला. यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षिकांचाही कार्यगौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘स्पोर्टस् मीट’ उत्साहात पार पडला. यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षिकांचाही कार्यगौरव करण्यात आला.
नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी धावणे व अक्षरांच्या जोड्या लावण्याची स्पर्धा घेण्यात आली. केजी-१ व २ साठी धावणे आणि शब्दांच्या जोड्या लावणे ही स्पर्धा घेण्यात आली. पालकांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात गौरी वाघ, प्राची खंडार, गोपाल पुरोहित, विवेक देशमुख, विनोद गाबडा, पलक विनोद गाबडा, आशीष चांभारे, चित्रा आशीष चांभारे यांना विजेते आणि उपविजेते जाहीर करून ट्रॉफी देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्ले ग्रुपने सनफ्लॉवर ड्रील, नर्सरीने पॉम पॉम ड्रील, मराठी मावळे ड्रील, केजी-१ ने बॉल व आदिवासी ड्रील सादर केली. केजी-२ च्या बालकांनी पिरॅमीड, योगा, झुम्बा डान्स, डम्बेल्स आदी क्रीडा प्रकार सादर केले.
उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये देवश्री ठोंबरे, सावी मेहत्रे, इशांत तायडे, रूद्राणी मंडल, विराज राऊत, आरूषी बोबडे, यज्ञेश जोशी, केतकी महाजन, स्वरा गौतम, इशान तोडकरी, अर्णव सरोदे, सौम्या ठाकरे, हर्षिता रामटेके, आद्या राऊत, हुनर तलरेजा, अर्पित जाधव, खुशी मजेठिया, स्वरा देशमुख, नफिसा बोहरा, शुभ मुंधडा, देवांश गिºहे, आर्कश जयस्वाल, अंश छत्ताणी, ओवी बांडे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, माणिकराव भोयर, आनंदराव गावंडे आदी लाभले होते.
सोनल राठोड, काजल राजा, वंदना पाटणकर, सीमा मोरे, स्मिता मेहेरे, मृणाल उत्तरवार या शिक्षिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका निहारिका प्रभुणे आदींनी मार्गदर्शन केले. समन्वयक सुनीता नवघरे आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.