शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:37 PM2017-09-29T23:37:13+5:302017-09-29T23:38:32+5:30

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

Spread the plan till the end | शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा

Next
ठळक मुद्देनिमिष मानकर : आर्णी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वित्त व बांधकाम सभापती मिनिष मानकर यांनी केले. ते पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
निमिष मानकर तथा जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी सभापती सूर्यकांत जयस्वाल उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांकडे असलेल्या अखर्चित निधीवर चर्चा करण्यात आली. हा निधी ताबडतोब खर्च करा, अशा सूचना मानकर यांनी दिल्या.
विविध विभागांचा आढावा घेताना संबंधित कर्मचारीवर्गाला आपल्या विभागाची सविस्तर माहितीच नसल्याचे समोर आले, त्यामुळे मानकर यांनी संताप व्यक्त केला. अनेक विभागाचे प्रमुख गैरहजर होते. संबंधित जिल्ह्यातील ही तालुका स्तरावरील वित्त विभागाची तिसरी बैठक आहे यामुळे नवीन पायंडा निर्माण झाला आहे. यामुळे विकास कामांना निश्चित वेग येईल असा आशावाद यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.
या आढावा बैठकीमुळे अनेक कामे ताबडतोब मार्गी लागतील असे यावेळी मानकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदचे वित्त विभागाचे कॅफो विजय देशमुख, अरून मानकर, दीपक पींपळकर, धनंजय जोशी, सहायक गटविकास अधिकारी राजेन्द्र डहाके तथा पंचायत समितीच्या विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Spread the plan till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.