बसचे टायर फुटताच मिनी ट्रकवर धडकली; एक ठार, नऊ प्रवाशांसह १४ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 10:25 AM2022-09-27T10:25:06+5:302022-09-27T10:27:56+5:30

मृत व जखमी मराठवाड्यातील रहिवासी आहेत.

ST bus hit a mini truck as the tire burst; One killed, 14 injured including nine passengers | बसचे टायर फुटताच मिनी ट्रकवर धडकली; एक ठार, नऊ प्रवाशांसह १४ जण जखमी

बसचे टायर फुटताच मिनी ट्रकवर धडकली; एक ठार, नऊ प्रवाशांसह १४ जण जखमी

Next

उमरखेड (यवतमाळ) : नांदेड जिल्ह्यातील कंधार आगाराची बस प्रवासी घेऊन नागपूरकडे जात असताना नागपूर- तुळजापूर रोडवरील तालुक्यातील मार्लेगाव गावाजवळ धावत्या बसचे उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे बस हदगावकडे जाणाऱ्या मिनी ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात ट्रकमधील एकजण ठार झाला, तर बसमधील नऊ प्रवासी आणि ट्रकमधील चार मजूर जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडला.

कंधार ते नागपूर ही बस (क्र. एमएच ४० एन ९६३४) उमरखेडकडे येत होती. अचानक बसचा टायर फुटल्याने बस हदगावकडून येणाऱ्या मिनी ट्रकवर (क्र. एमएच २६ एच ९८२१) जाऊन धडकली. या अपघातात मिनी ट्रकमधील मजूर संतोष काळबांडे (३८, रा. महात्मा फुले वाॅर्ड, हदगाव) हा जागीच ठार झाला. बसचालक विठ्ठल पुंडे (४०), वच्छला काळे (७५), जनाबाई कांबळे (६०), कपिल साळवे (२९), मारोती शिंदे (६५), मारोती नरवाडे (७५), रोशनी जामोदकर (३६), सीमा जामोदकर (२५), सविता नरवाडे (३७), परशुराम पांचाळ (३५) हे जखमी झाले आहेत. जखमींवर उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व जखमी मराठवाड्यातील रहिवासी आहेत.

जखमींना नांदेडला हलविले

या अपघातात मिनी ट्रकमधील अन्य चार मजूरही जखमी झाले आहेत. त्यांना हदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांना नंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत देशमुख, अकुंश दरबस्तेवार, नरेंद्र पुंड आदी घटनास्थळी पोहोचले. उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: ST bus hit a mini truck as the tire burst; One killed, 14 injured including nine passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.