उभ्या ट्रकवर आदळून एसटी बस उलटली, १९ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:32 AM2023-08-10T11:32:15+5:302023-08-10T11:35:58+5:30

पुसद तालुक्यातील तिघांचा समावेश

ST bus overturns after hitting stationary truck, 19 passengers injured | उभ्या ट्रकवर आदळून एसटी बस उलटली, १९ प्रवासी जखमी

उभ्या ट्रकवर आदळून एसटी बस उलटली, १९ प्रवासी जखमी

googlenewsNext

पुसद (यवतमाळ) : पुसदहून मुंबईला निघालेली जालना जिल्ह्यातील मंठा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यात बस उलटली. या अपघातात बसमधील १९ प्रवासी जखमी झाले. त्यात तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकातून पुसद ते मुंबई ही परिवहन महामंडळाची बस (क्र. एमएच १३/सीयू ७५१२) रवाना झाली. जालना- मंठा रोडवर बिघाड झाल्याने उभा असलेल्या आयशर ट्रकला बसची धडक बसली. त्यामुळे बस उलटली. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले आहे. बसमध्ये एकूण ४२ प्रवासी होते. मंठा शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील केंधळी गावाजवळ हा अपघात झाला.

बसचालक सुभाष भगाजी चिकणे, वाहक संतोष दिगंबर मोटे होते. ट्रक (क्र.एमएच २०/ सीजी ९४८५) रस्त्याच्या कडेला उभा होता. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडल्याचे सांगितले जाते. अपघातात तालुक्यातील सेलू येथील हरिभाऊ पुंडलिक धुके, अरुणा हरिभाऊ धुके, पीयूष हरिभाऊ धुके हे तिघे जखमी झाले आहे. जखमी ८ प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय मंठा येथे, तर ११ प्रवाशांना जिल्हा रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून जखमींना तत्काळ आर्थिक मदत देण्यात आली. चालक, वाहक यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

चालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

बसचालकाने रस्ते वाहतूक नियमांचे पालन न केल्याने, तसेच मार्गस्थ बिघाड असलेल्या ट्रकच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. अपघातास चालक जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, अशी तक्रार जालना आगाराच्या नियंत्रकांनी मंठा पोलिस स्टेशनला दिली. अपघातग्रस्त बसचे ९५ हजारांचे नुकसान झाले, अशी माहिती पुसद आगाराचे व्यवस्थापक मंगेश पांडे यांनी दिली.

Web Title: ST bus overturns after hitting stationary truck, 19 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.