भयानक... अज्ञातांनी एसटी बस पेटवली, ७३ प्रवासी सुखरूप, उमरखेड तालुक्यातील घटना
By विलास गावंडे | Published: October 28, 2023 07:04 AM2023-10-28T07:04:26+5:302023-10-28T07:05:03+5:30
गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिली.
विलास गावंडे, यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहे.
नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मोटारसायकल स्वाराने ही बस थांबवली. त्यामागून आलेल्या पाच ते सहा लोक आले. तोपर्यंत बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले होते. या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.
या घटनेत एमएच २०- जीसी ३१८९ या क्रमांकाच्या बसचे ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळनारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलिस करीत आहे. या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे, तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांनी व इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.