‘एसटी’च्या सवलत पास वितरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:06+5:30

एक महिन्याची रक्कम भरून दोन महिन्याची पास, सही व शिक्का नसलेली पास, तारखेची चुकीची नोंद, पास देणाºया अधिकाºयांचा अपूर्ण हुद्दा (कंसात वरिष्ठ नाही) असलेला शिक्का, असे प्रकार घडत आहे. या सर्व प्रकारात एसटीचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच पासधारक प्रवाशांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रसंगी आर्थिक भुर्दंडही बसत आहे.

'ST' discount pass distribution solution | ‘एसटी’च्या सवलत पास वितरणात घोळ

‘एसटी’च्या सवलत पास वितरणात घोळ

Next
ठळक मुद्देसही-शिक्के नाही : एक महिन्याच्या रकमेत दोन महिन्याचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) आर्थिक डोलारा डगमगत आहे. तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामात गांभीर्य दाखविले जात नाही. पास वितरणात घोळ घालण्यात आला आहे. या प्रकारात पासधारकांना मोफत प्रवासाची मुभाच मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी बोगस पास प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती, हे विशेष:
एक महिन्याची रक्कम भरून दोन महिन्याची पास, सही व शिक्का नसलेली पास, तारखेची चुकीची नोंद, पास देणाºया अधिकाºयांचा अपूर्ण हुद्दा (कंसात वरिष्ठ नाही) असलेला शिक्का, असे प्रकार घडत आहे. या सर्व प्रकारात एसटीचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच पासधारक प्रवाशांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रसंगी आर्थिक भुर्दंडही बसत आहे. अधिकारी, कर्मचाºयांचा कामातील चालढकलपणा याला कारणीभूत ठरत आहे.
विद्यार्थी पास एक महिन्याचीच दिली जाते. पांढरकवडा आगाराने दोन महिन्याची पास देण्याचा प्रताप केला आहे. या विद्यार्थ्यांना दोन महिने प्रवासाची संधी आपसुकच मिळाली आहे. त्यांच्याकडून नेमकी किती महिन्याची रक्कम घेण्यात आली, हे शोधण्याची आवश्यकता आहे. सदर प्रकार अधिकाºयांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विविध घटकांना दिल्या जाणाºया पासविषयी संशयास्पद स्थिती निर्माण झाली आहे. यात तथ्यही आढळले आहे. अशाच प्रकरणात यवतमाळ आगारातील दोन कर्मचाºयांवर कारवाई झाली आहे. परंतु काही प्रकरणात पासधारक भरडला जात आहे. खरे असूनही खोटे ठरवून पासधारकाला वेठीस धरले जाते. काही ठिकाणी पास देताना संबंधित अधिकाºयाचा परिपूर्ण शिक्का राहात नाही. यवतमाळ आगार व्यवस्थापकाचा शिक्का कंसात वरिष्ठ असाच असावा लागतो. वाहकांकडून अशी पास बोगस ठरविण्याचा प्रयत्न होत आहे. ही दक्षता अनेक ठिकाणी घेतली जात नसल्याचे दिसून येते.

पास दोन महिन्याची दिली असली तरी एकच महिन्याची ग्राह्य धरली जाणार आहे. एसटीचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नाही.
- अनंत ताटर,
आगार व्यवस्थापक, पांढरकवडा

Web Title: 'ST' discount pass distribution solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.