एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 04:25 PM2021-12-01T16:25:38+5:302021-12-01T16:27:02+5:30

मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते.

ST driver dies due to heart attack in yavatmal | एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

Next


यवतमाळ - दारव्हा आगारातील संपकरी एसटी चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. (ST driver dies due to heart attack)

मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून तेसुद्धा या संपात सहभागी होते. अशातच मंगळवारी रात्री त्यांना त्यांचे राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

एसटी कर्मचारी आपल्या मागण्या सह संपावर ठाम आहेत. तर प्रशासनाकडून संप मागे घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातही तणावाचे वातावरण आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत अब्दुल जमील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
 

 

Web Title: ST driver dies due to heart attack in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.