एसटी प्रवाशांची सुरक्षा ‘स्टेअरिंग फ्री’ने धोक्यात

By admin | Published: January 18, 2015 10:49 PM2015-01-18T22:49:44+5:302015-01-18T22:49:44+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील अनागोंदी प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. बसचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले स्टेअरिंग फ्री होण्याच्या प्रकारामुळे

ST passengers' security threatened with 'steering free' | एसटी प्रवाशांची सुरक्षा ‘स्टेअरिंग फ्री’ने धोक्यात

एसटी प्रवाशांची सुरक्षा ‘स्टेअरिंग फ्री’ने धोक्यात

Next

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील अनागोंदी प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहे. बसचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेले स्टेअरिंग फ्री होण्याच्या प्रकारामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेली १५ दिवसात झालेल्या गंभीर घटनेनंतरही या प्रकाराकडे दुर्लक्ष सुरू आहे. प्रवाशांचे बळी गेल्यानंतरच यात सुधारणा होईल काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जवळपास बसच्या स्टेअरिंगमध्ये प्ले असून जामही आहे. काही बसेसचे स्टेअरिंग तर फ्री झालेले आहे. त्यामुळे चालकांना वाहन हाकताना गंभीर बाबींना सामोरे जावे लागते. मार्गातील बसचे स्टेअरिंग पूर्णपणे फ्री झाल्यास चालकाचे नियंत्रण सुटून बस वाट सापडेल तिकडे धावते. यात अपघात होतो. बहुतांश वेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळतात. मात्र काही बाबतीत घटना टळणे अशक्य असते.
आयुष्य संपलेली वाहनेही रस्त्यावर धावतात. तरीही अशा बसेस मार्गावर सोडल्या जातात. आर्णी मार्गावर शहरालगत एका बसला अपघात झाला. या बसच्या चालकाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही दिवसांपूर्वी ९८६५ या क्रमांकाची बस अकोलाबाजारजवळ उलटली. यात काही प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात स्टेअरिंग फ्री झाल्यामुळेच घडल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
अपघातानंतर कारण शोधण्याचे सोपस्कार महामंडळाच्या कार्यशाळा विभागाने पार पाडले. या अपघाताला चालकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. खड्डा चुकविता न आल्याने अपघात घडल्याचे मत त्यांनी नोंदविले. वास्तविक कुठलेही रस्ते गुळगुळीत नाही. प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. मग सर्वच बसला अपघात का होत नाही, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित केला जात आहे. यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची चूक झाकण्यासाठी अशा घटनांमध्ये चालकांचा बळी दिला जात असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)

Web Title: ST passengers' security threatened with 'steering free'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.