एसटी दरात १० टक्के कपात

By admin | Published: November 24, 2015 05:24 AM2015-11-24T05:24:14+5:302015-11-24T05:24:14+5:30

दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची

ST rates cut by 10% | एसटी दरात १० टक्के कपात

एसटी दरात १० टक्के कपात

Next

रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
दिवाळीपूर्वी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात १० टक्क्याने वाढ केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. मात्र, आता उत्पन्नात २४ टक्के वाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने वाढविलेले तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून दरात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसे आदेश परिवहन विभागात धडकले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक नागरिक एसटीनेच प्रवास करतात. त्यामुळे तिकीट दरवाढीचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांनाच बसला होता. राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीपूर्वी तिकीटदरात १० टक्के वाढ केली होती. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही तिकिट दरवाढ लागू झाली होती. दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या तिकिटदराने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. एसटीने दर वाढविताच खासगी वाहनांचेही दर वाढले होते. दिवाळीचा कालावधी संपताच परिवहन महामंडळाने नवा आदेश काढला आहे. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांनी दर कमी करण्याच्या सूचना आहेत. यामुळे ४ नोव्हेंबरपूर्वीचेच तिकिटदर २६ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना यातून दिलासा मिळणार आहे.

वणी, उमरखेडचे उत्पन्न वाढले
४दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहन चालकांनी भाडे ३०० पटीने वाढविले होते. त्या तुलनेत एसटीचे दर कमी होते. यामुळे नागरिकांची पहिली पसंती राज्य परिवहन महामंडळाला होती. यातून एसटीचे उत्पन्न २४ टक्क्यांनी वाढले. गतवर्षी यवतमाळ जिल्ह्यात परिवहन महामंडळाला दिवाळीच्या पर्वावर चार कोटी २८ लाख १९ हजारांचे उत्पन्न झाले होते. २०१५-१६ मध्ये दिवाळीच्या पर्वात परिवहन महामंळाला पाच कोटी २१ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षाच्या तुुलनेत उत्पन्नामध्ये २४ टक्केने वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६२ लाख २७ हजाराचे उत्पन्न वणी विभागाला मिळाले. त्या खालोखाल उमरखेड विभागाला ६२ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

पुणे बसला पहिली पसंती
४पुणे बसफेऱ्या फायद्याच्या ठरल्या. ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच्या तोंडावर भाड्यात ३०० टक्क्यां वाढ केली होती. परिणामी विद्यार्थी आणि नागरिकांना ३५०० रूपये तिकिटासाठी मोजावे लागले होते. परिवहन महामंडळाने नियमित दरात प्रवाशांची बुकींग केली. यामुळे प्रवाशांचा लोंढा राज्य परिवहन महामंडळाकडे वळला होता.

राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीच्या पर्वातच १० टक्के दरवाढ केली. २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ मागे घेतली जाणार आहे. या विषयीचे आदेश धडकले आहेत. यामुळे जुन्या तिकिट दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
- शिवाजी जगताप
विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ

Web Title: ST rates cut by 10%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.