डिझेल संपल्याने एसटी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:22 PM2018-09-25T22:22:50+5:302018-09-25T22:23:16+5:30

आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले.

ST stopped after diesel ended | डिझेल संपल्याने एसटी थांबली

डिझेल संपल्याने एसटी थांबली

Next
ठळक मुद्देविभागात ठणठणाट : प्रवाशांचे हाल, आर्थिक टंचाईचा मार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले. आर्थिक टंचाईमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नऊ आगार आहेत. यातील यवतमाळसह वणी, पांढरकवडा या मोठ्या आगारांनाही डिझेल तुटवड्याचा फटका बसला. वणीची गरज नेर आगारातून डिझेल नेऊन भागविण्यात आली, तर पांढरकवडा आगाराला दुपारी डिझेल पोहोचले. यवतमाळ आगाराला संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
आगारातील आणि बाहेरून येणाºया बसेसमध्ये डिझेल भरण्याची सोय आगारामध्ये करण्यात आलेली आहे. भरपूर क्षमतेच्या डिझेल टँक आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे या टँक अपवादानेच पूर्ण भरल्या जात आहे. केवळ दोन ते तीन दिवसांचाच साठा केला जातो. ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास फेºया रद्द केल्या जातात. असाच प्रकार मंगळवारी घडला. जिल्ह्यातील बहुतांश आगारातील टँकमध्ये डिझेल नव्हते.
यवतमाळ आगाराला दररोज किमान सहा हजार लिटर डिझेलची आवश्यकता आहे. मात्र येथे केवळ दोन दिवसांची सोय करण्यात येते. १२ हजार लिटर डिझेल बोलाविले जाते. किमान २० हजार लिटर डिझेलचा साठा असल्यास चार दिवसांची सोय होते. या आगाराची डिझेल साठवण क्षमता ३४ हजार लिटरची आहे. तरीही साठवण करण्यात हात आखडता घेतला जात आहे. महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

Web Title: ST stopped after diesel ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.