‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

By विलास गावंडे | Published: October 14, 2024 12:33 PM2024-10-14T12:33:59+5:302024-10-14T12:34:45+5:30

साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल.

'ST' travel is expensive; 10% increase in rent for a month for Diwali | ‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

‘एसटी’प्रवास महाग; दिवाळीपुरती महिनाभर १०% भाडेवाढ

यवतमाळ : दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली आहे. वातानुकूलित शिवनेरी (आसनी) वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसकरिता २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू असेल.

साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. हंगाम संपल्यानंतर २६ नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होईल. सहा किलोमीटरचा एक टप्पा असतो. यानुसार साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाली असल्याने ९.५५ रुपये म्हणजे एकूण दहा रुपये एका टप्प्यासाठी मोजावे लागणार आहेत.

अशी होईल भाडेवाढ
- साधी आणि जलदचे तिकीट 
सध्या प्रति टप्पा (६ किमी) ८.७० रुपये आहे. १० टक्के भाडेवाढ धरून ती ९.५५ रुपये होईल. 
- निमआराम, स्लिपर ११.८५ वरून १३.०५ रुपये होईल.
- ई बसचे तिकीट सध्या १२.३५ रुपये आहे ते १३.६० रुपये होईल.
- शिवाई व शिवशाहीचे तिकीट १२.३५ वरून १३.६० होईल.
- शिवनेरीचे तिकीट १२.९५ वरून १४.२५ रुपये होईल.
 

Web Title: 'ST' travel is expensive; 10% increase in rent for a month for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.