आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 05:00 AM2021-10-28T05:00:00+5:302021-10-28T05:00:02+5:30

राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ३० जून २०१८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, घरभाडे भत्ता मिळावा, उत्सव अग्रीम दोन वर्षांपासून कमी करण्यात आला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

ST workers' agitation intensified from today | आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. यातूनच विभागीय कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू झाले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारपासून एसटीचे कर्मचारी आंदोलन तीव्र करणार आहेत. जिल्हास्तरावर असलेले हे आंदोलन प्रत्येक आगारात होणार आहे. यामुळे वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. 
राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ३० जून २०१८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, घरभाडे भत्ता मिळावा, उत्सव अग्रीम दोन वर्षांपासून कमी करण्यात आला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. 
३०६ कर्मचाऱ्यांना कोरोना काळात जीव गमवावा लागला. यानंतरही कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यानंतरही हक्काची देयके मिळाली नाहीत, यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. मागण्या पूर्ण न झाल्यास गुरुवारपासून एसटी कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. यामुळे  एसटीची चाके थांबणार आहेत. याचा फटका प्रवासी वाहतुकीला बसणार आहे. 
या आंदोलनात सदाशिव शिवणकर, संजय जिरापुरे, स्वप्निल तगडपल्लेवार, रवींद्र सातपुते, राहुल धार्मिक, पंकज लांडगे, प्रकाश बहाड, अभिजित बुटे, सुरेश कनाके, सुशांत इंगळे, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत गावंडे, अमोल ठाकूर, अशोक कुमकर, समाधान सोंडकर, उमेश चव्हाण, निखिल दौलतकार, राजू सुतार, राजू मिरासे, प्रवीण बोकडे, यशवंत कडू, माधव पराते, गणेश बेंद्रे, प्रवीण बोनगीनवार, जितेंद्र पाटील, अविनाश भांडवलकर, ममता राम, निमसरकर, पोलादे यांच्यासह मोठ्यासंख्येने एसटीचे कर्मचारी सहभागी झाले होते.  

एसटीच्या प्रवासाला कुठलाही धक्का पोहोचू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंदोलनात नसलेले कर्मचारी परिवहन महामंडळ या काळात प्रवासी वाहतुकीसाठी वापरणार आहे. यामुळे आंदोलनाचा कुठलाही परिणाम वाहतुकीवर होणार नाही. जनसामान्यांना नियोजित स्थळी पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.               

- प्रताप राठोड
विभाग वाहतूक अधिकारी

 

Web Title: ST workers' agitation intensified from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.