एसटी कामगारांचा बंद

By admin | Published: February 11, 2017 12:17 AM2017-02-11T00:17:24+5:302017-02-11T00:17:24+5:30

आॅटोरिक्षा चालकांच्या मारहाणीत भिवंडी येथे प्रभाकर गायकवाड या एसटी बस चालकाचा मृत्यु झाला.

ST workers stop | एसटी कामगारांचा बंद

एसटी कामगारांचा बंद

Next

चालक मृत्यू प्रकरण : ठिकठिकाणी निवेदने
यवतमाळ : आॅटोरिक्षा चालकांच्या मारहाणीत भिवंडी येथे प्रभाकर गायकवाड या एसटी बस चालकाचा मृत्यु झाला. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील काही आगारांमध्ये बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी निषेध नोंदविला गेला. दरम्यान, एसटीच्या विविध कामगार संघटनांनी आगार व्यवस्थापक निवेदन देण्यात आले आहे. शिवाय यवतमाळ आगारातील कामगारांना आॅटोरिक्षामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही यामध्ये मांडण्यात आल्या आहे.
यवतमाळ, उमरखेड, पांढरकवडा, दारव्हा, नेर, राळेगाव आगारातील कामगारांनी वाहतूक बंद केली. पुसद-दिग्रस येथे निषेध नोंदविण्यात आला. यवतमाळ आगारातील वाहतूक जवळपास सव्वा तास बंद होती.
महाराष्ट्र मोटर कामगार फेडरेशन संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कस (इंटक), कास्ट्राईब एसटी संघटना, संघर्ष ग्रुपने बंद आणि निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला. बसचालक गायकवाड मृत्युप्रकरणी संबंधित आटोचालकांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून झाली नाही. शिवाय एसटी प्रशासनाकडूनही पाठपुरावा करण्यात आला नाही, ही बाब खेदाची असल्याचे कामगार संघटनांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यवतमाळ बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारावर सर्रासपणे आटोरिक्षा आणले जातात. त्यामुळे बसचालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आटोरिक्षा आणि खासगी वाहनांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: ST workers stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.