ऊस उत्पादकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:45 PM2018-09-03T21:45:27+5:302018-09-03T21:45:46+5:30

गतवर्षीच्या गाळप हंगामातील राहिलेले ४५० रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी डेक्कन शुगरविरूद्ध ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार शेतकरी कारखाना प्रशासनाशी चर्चेसाठी आले होते. मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

Stain of sugarcane growers | ऊस उत्पादकांचा ठिय्या

ऊस उत्पादकांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देडेक्कन शुगर : पोलिसांनी अडविल्याने संताप, प्रशासनाशी चर्चाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळ : गतवर्षीच्या गाळप हंगामातील राहिलेले ४५० रुपये देण्यात यावे, या मागणीसाठी डेक्कन शुगरविरूद्ध ४०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार शेतकरी कारखाना प्रशासनाशी चर्चेसाठी आले होते. मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
२०१७-१८ या गाळप हंगामात उसाला प्रती टन २२५० रुपये देण्याचे येथील डेक्कन शुगरने जाहीर केले होते. सुरुवातीला एक हजार १०० आणि नंतर ७०० रुपये असे एकूण एक हजार ८०० रुपये दिले. उर्वरित ४५० रुपयांसाठी झुलवत ठेवले. वारंवार मागणी करूनही ही रक्कम देण्यास कारखाना प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे.
१० आॅगस्ट रोजी शेतकºयांनी कारखान्यावर धडक देऊन संचालकांना घेराव घातला होता. त्यावेळी ३ सप्टेंबर रोजी चर्चा करू असे सांगितले होते. यानुसार ४०० ते ५०० शेतकरी कारखान्यावर धडकले. मात्र त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शेतकरी कारखान्याच्या आवारात शिरले. अध्यक्षांनी प्रत्यक्ष कारखान्यात येऊन चर्चा करावी, अशी भूमिका शेतकºयांनी घेतली. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळत गेली. ४५० रुपये मिळाल्याशिवाय डेक्कन शुगर फॅक्टरी व डेक्कन वाईन फॅक्टरी चालू देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, तालुका प्रमुख किशोर इंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विश्वास लांडगे, शेतकरी संघर्ष समितीचे देवानंद पवार आदी सहभागी झाले होते.

Web Title: Stain of sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.