‘त्या’ युवकाला घातक शस्त्रे बाळगण्याचा छंद

By admin | Published: August 13, 2016 01:24 AM2016-08-13T01:24:12+5:302016-08-13T01:24:12+5:30

प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात.

'That' stalking hazardous weapons' to the young man | ‘त्या’ युवकाला घातक शस्त्रे बाळगण्याचा छंद

‘त्या’ युवकाला घातक शस्त्रे बाळगण्याचा छंद

Next

अमृतसरच्या पार्सलने भंडाफोड : पोलिसांच्या घरझडतीत आणखी शस्त्रे जप्त
यवतमाळ : प्रत्येकाला कशाचा ना कशाचा छंद असतो. आपल्या आवडीच्या वस्तू गोळा करण्यासाठी अनेक जण आपले आयुष्य खर्ची घालतात. छंद जोपासणे हा वैयक्तिक विषय होय. मात्र अमृतसरवरुन पोस्टाने आलेल्या एका पार्सलने यवतमाळातील एका तरुणाचा घातक शस्त्रे गोळा करण्याच्या छंदाचा भंडाफोड झाला. त्याच्या घरझडतीत मोठा शस्त्रसाठाही आढळून आला.
अमृतसर येथून पोस्टाच्या कुरिअरने तलवारी यवतमाळात चार तलवारी बोलविण्यात आल्याचे ‘लोकमत’ वृत्त ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकताच, त्याची दखल घेऊन टोळी विरोधी पथकाने घेत येथील आनंदनगरातील अमोल रामानंद पांडे (३०) याच्या घराची झडती घेतली. यवतमाळाच्या मध्यवर्ती डाक कार्यालयात अमृतसरवरून एक पार्सल आले. हाताळणीत या पार्सलचे पॅकींग फाटल्याने त्यात तलवारी असल्याचे आढळून आले. सदर बाब मागील आठ दिवसांपूर्वीच डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. यावर वरिष्ठांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर ‘लोकमत’मध्ये या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले. पोस्टाकडून कोणती ही कारवाई होण्यापूर्वीच टोळी विरोधी पथकाने शुक्रवारी सकाळी सदर युवकाचे घर गाठून झडती घेतली. यामध्ये त्या युवकाच्या घरात एक धारदार तलवार, फरशी कुऱ्हाड आणि तीन गुप्ती असा घातक शस्त्र साठा आढळून आला. अमोल पांडे या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभुमी आहे काय, याचाही शोध टोळी विरोधी पथक घेत आहे. अमोल विरोधात शस्त्रात्र प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला.
शहरात मागील काही दिवसापासून सातत्याने खुनाचे सत्र सुरू आहे. गुन्हेगारी टोळक्यामध्ये आपसातील वादातून बहुतांश खुन झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये वापरण्यात येणारी धारदार शस्त्र आणि अमोल पांडे याचे काही कनेक्शन लागते काय, याचाही पोलीस तपास करणार आहे.
मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा बोलावून येत्या काही दिवसात मोठा घातपात घडविण्याचा कट तर नाही ना, यावरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अमोल पांडे याने पॉलिटेक्निकचा डिल्पोमा केला आहे. सध्या तो आर्णी मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपमध्ये नोकरी करत असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.
त्याने अृमतसर येथील हॅन्डीक्राफ कंपनीकडून या चार तलवारींची आॅर्डर केल्या. त्याच कंपनीने अमोलच्या पत्यावर हा शस्त्रसाठा कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्याची व्यवस्था केली. (कार्यालय प्रतिनिधी)

 

Web Title: 'That' stalking hazardous weapons' to the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.