कर्मचाऱ्याने जोपासला चलन संग्रहाचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 10:12 PM2018-02-15T22:12:28+5:302018-02-15T22:12:55+5:30

छंद मग कोणताही असो, तो पूर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. नेर न्यायालयात कार्यरत विजयकुमार झ्यंबकलाल द्विवेदी यांनाही एक अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.

Stamp collection | कर्मचाऱ्याने जोपासला चलन संग्रहाचा छंद

कर्मचाऱ्याने जोपासला चलन संग्रहाचा छंद

Next
ठळक मुद्देदेशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : छंद मग कोणताही असो, तो पूर्ण करेपर्यंत जीवाला आराम नसतो. नेर न्यायालयात कार्यरत विजयकुमार झ्यंबकलाल द्विवेदी यांनाही एक अनोखा छंद जडला आहे. देशविदेशातील विविध नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.
यवतमाळ येथील रहिवासी असलेले विजयकुमार द्विवेदी यांना मागील ३१ वर्षांपासून देशविदेशातील चलन गोळा करण्याचा छंद जडला. एक पैशापासून ते दोन हजार रुपयापर्यंतच्या नोटा त्यांनी गोळा केल्या. भारतीय रिझर्व बँकेने जेवढ्या वेळा नोटा बदलविल्या तेवढ्या बदललेल्या नोटा त्यांच्याकडे आहेत. तसेच २६० प्रकारची विविध नाणी त्यांच्याकडे आहे. एक रुपयापासून हजार रुपयांपर्यतच्या नोटा कशा बदलल्या याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. नेपाळ, भुतान, सौदीअरब, झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशीया, चीन यासह विविध देशातील चलन व नाण्यांचा अपूर्वसग्रह त्यांच्याकडे आहे.
पाच रुपयांचे नाणे आतापर्यंत ४६ वेळा बदलले आहे. दहा रुपयांच्या नाण्यात दहा वेळा बदल झाल्याची माहिती विजयकुमार यांनी दिली. नाणी व नोटा गोळा करण्याचा छंद जपताना ते बऱ्याच देशात फिरले. सरकारी नोकरी लागण्यापूर्वी ते राजस्थान येथे खासगी देशविदेश व्हीसा विभागात कार्यरत होते. ही कामे करत असतानाच त्यांना हा अनोखा छंद जडला. यासाठी त्यांना पत्नी रेखा यांनीही सतत प्रोत्साहित केले. वडिलांच्या या चलन सग्रहाच्या छंदाला मुलगा अक्षय आणि मुलगी निक्की हेसुध्दा हातभार लावतात.
नाणी आणि नोटा गोळा करण्याशिवाय विजयकुमार यांना विविध देशातील पोष्टाच्या तिकिटा गोळा करण्याचाही छंद आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनातून विजयकुमार यांच्या या छंदाची लोकांना ओळख होते. अलीकडेच नेर येथे झालेल्या प्रदर्शनात विजयकुमार यांनी गोळा केलेली नाणी आणि नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

Web Title: Stamp collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.