मुद्रांक विक्रेत्यांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 09:58 PM2017-10-09T21:58:24+5:302017-10-09T21:58:41+5:30

इ-चलान प्रक्रियेतून मुद्रांक विक्रेत्यांना वगळून बँकेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात आली.

Stamp Sellers Closed | मुद्रांक विक्रेत्यांचा बंद

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद

Next
ठळक मुद्देउपासमारीची वेळ : जिल्ह्यात ८० लाख रुपयांची उलाढाल थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : इ-चलान प्रक्रियेतून मुद्रांक विक्रेत्यांना वगळून बँकेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात आली. याविरोधात मुद्रांक विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील ८० लाखांची उलाढाल थांबली.
राज्यातील मुद्रांक विक्रीची प्रथा बिटिशकाळापासून आहे. यामुळे मुद्रांक विक्रीचा अनेक पिढ्यांचा हा मूळ व्यवसाय आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने मुद्रांक विक्रीचा व्यवहार आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बँकेकडे सोपविण्यात येणार आहे.
मुद्रांकाकरिता ट्रान्झॅक्शन करणाºया ग्राहकाला प्रत्येकी ५० रूपये खर्च बँक खात्यात जमा करावा लागणार आहे. मुद्रांक विक्रेत्यांनी एका स्टॅम्पवर केवळ १० टक्के दरात आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासनाला दिला आहे. यामुळे १०० रूपयाच्या स्टॅम्पकरिता ५० रूपये नव्हेतर ३ रूपयेच सरकारला द्यावे लागणार आहे.
तरीही महसूल प्रशासनाने स्टॅम्प विक्रेत्यांचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे राज्यातील स्टॅम्प विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला जिल्हा शासनमान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेख संघटनेने पाठिंबा दिला आहे.
राज्यातील प्रचलीत छापील मुद्रांकविक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर १० टक्के मनोती (कमिशन) मिळावी. राज्यात सुरू असलेली इ-चलान तसेच इएसबिटीआर ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या मार्फत राबविण्यात यावी.एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावा. मय्यत मुद्रांक विक्रेत्यांचे वारस हक्काने परवाना मिळावा. या प्रमुख मागण्याचा यामध्ये समावेश आहे.
या मागण्यापूर्ण होईपर्यंत हे आंदोलन कायम राहणार आहे. याविषयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय खडसे, उपाध्यक्ष श्रीराम पंडीत, वसंत कावळे, अविनाश डहाके, नरेश गुल्हाणे, विजय खडसे, राजु दुधे, भानुदास बोंडे, श्रीधर शुक्ला, मंगेश डहाके, प्रकाश शुक्ला, मिना राऊत, ताराबाई डोंगरे, धनराज भिमटे, रमेश बरलोटा यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.

Web Title: Stamp Sellers Closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.