आर्णीत बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:08 AM2018-02-06T00:08:29+5:302018-02-06T00:08:49+5:30
हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक, सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला सोमवारपासून आर्णीत प्रारंभ झाला आहे. अरुणावतीच्या तीरावर भाविकांचा मेळा जमला आहे.
आॅनलाईन लोकमत
आर्णी : हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक, सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाला सोमवारपासून आर्णीत प्रारंभ झाला आहे. अरुणावतीच्या तीरावर भाविकांचा मेळा जमला आहे.
परंपरेप्रमाणे यामहोत्सवाची सुरुवात आर्णी ठाणेदाराच्या निवासस्थानावरून निघाणाºया संदलने झाली. यासोबतच अनेक व्यावसायिक आणि घराघरातून निघणारे जोशपूर्ण संदल शहरात नवचैतन्य निर्माण करीत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या महोत्सवासाठी दर्गा कमेटीने नियोजन केले आहे. पोलीस यंत्रणेचा मायक्रोवॉच राहणार आहे. तालुक्यातील नव्हे तर जिल्हाभरातून लाखो भाविक बाबा कंबलपोषच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आर्णी डेरे दाखल होत आहे. सात दिवस चालणाºया या महोत्सवात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून बाबा कंबलपोष दर्गा कमेटी जातीने लक्ष देत आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
यात्रा महोत्सव उत्साहात पार पडवा म्हणून आर्णीचे ठाणेदार नंदकिशोर पंत, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भंडारे, व्यंकटेश मच्छेवार, तारासिंग जाधव, सचिन भेंडे, गणेश हिरोळकर, भालचंद्र तिडके, राजेंद्र गडप्पा, दिनेश जाधव प्रयत्न करीत आहे.