आर्णी मार्गाचे चौपदरीकरण प्रारंभ
By admin | Published: February 28, 2017 01:28 AM2017-02-28T01:28:25+5:302017-02-28T01:28:25+5:30
आर्णी मार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या निधीतून मंजूर झाले आहे.
यवतमाळ : आर्णी मार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्राच्या निधीतून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन स्थानिक आर्णी रोडवरील नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, विजय कोटेचा, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेत्रे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत बसस्थानक ते वनवासी मारोती मंदिरापर्यंत साडेतीन किलोमीटर सिमेंट काँक्रीट चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. २४ मीटर रुंदीच्या या रोडमध्ये सेंट्रल डिव्हाडर, फुटपाथ, नाल्या व पोच मार्गाचे काम करण्यात येणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या प्रमुख राज्यमार्ग क्रमाक ६ चा एक भाग असलेल्या या साडेतीन किमी रस्त्याचे काम वर्षभरात पूर्ण होणार आहे. या रस्त्यामुळे यवतमाळच्या विकासात भर पडेल. त्यामुळे नागरिकांनी अतिक्रमण काढून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी सभापती नितीन गिरी, जगदीश वाधवाणी, उद्धवराव येरमे, विजय खडे, सीताताई इसाळकर, भवरे, मनोज मुधोळकर, शुभांगी हातगावकर, प्रियांका भवरे, संदीप तातेड, विजय घाडगे, प्रदीप वादाफळे, संजय शिंदे, मनोज मॅडमवार, उपअभियंता योगेश लाखाणी, संदीप गिरी आदी उपस्थित होते. संचालन कैलास राऊत यांनी केले. (वार्ताहर)