पिकांच्या नुकसानीसाठी विमा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:06 PM2018-12-17T22:06:46+5:302018-12-17T22:07:04+5:30

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी वन्यजीव पीक संरक्षण विमा योजना सुरू करावी, तसेच शेतकरी-शेतमजुरांसाठी कृषी जीवन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली.

Start insurance for crop losses | पिकांच्या नुकसानीसाठी विमा सुरू करा

पिकांच्या नुकसानीसाठी विमा सुरू करा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना साकडे : शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी वन्यजीव पीक संरक्षण विमा योजना सुरू करावी, तसेच शेतकरी-शेतमजुरांसाठी कृषी जीवन विमा योजना सुरू करावी, अशी मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली.
वन्यजीवांमुळे पिकांचे होत असलेले नुकसान व शेतकरी- शेतमजुरांचे होत असलेले मृत्यू आणि अपघात, यासाठी स्वतंत्र विमा योजना अत्यंत आवश्यक आहे. पारवा येथे संकटग्रस्त शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद झाली. या परिषदेत यासंदर्भात ठराव मंजूर झाला. परिषदेत सर्व शेतकऱ्यांची ही मागणी केली. त्यामुळे शासनाने ती अंमलात आणावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार, अ‍ॅड.विजयाताई धोटे, अशोक भुतडा, किरण कुमरे, यशवंत इंगोले, कमलकिशोर धीरेन, माजी जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, सचिन पारवेकर, माजी सभापती शैलेश इंगोले, रुपेश कल्यमवार, रमेश आंबेपवार आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन दिले.
२५ लाख मिळावे
वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे शेतकरी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करू शकत नाही. त्यामुळे शासनाने स्वतंत्र विमा योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून केली. तसेच वनप्राण्यांमुळे शेतकरी, शेतमजुरांच्या होणारया जीवित व शारीरिक हानीसाठीसुद्धा अपघात विमा योजनेच्या धर्तीवर कृषी जीवन विमा योजना सुरू करून मृतकाच्या वारसाला किमान २५ लाख रुपये किंवा अपघातग्रस्त व्यक्तीला किमान पाच लाखांचा विमा लागू करावा अशीही मागणी केली.

Web Title: Start insurance for crop losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.