दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 10:50 PM2017-10-25T22:50:16+5:302017-10-25T22:50:26+5:30

पणन महासंघाची दिग्रसमध्ये अद्यापही कापूस खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे.

Start shopping of groceries | दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा

दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक टंचाईत

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : पणन महासंघाची दिग्रसमध्ये अद्यापही कापूस खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे. त्यातून शेतकºयांची लूट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी पणनने दिग्रस येथे तत्काळ खरेदी केंद्र सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शेतकºयांच्या घरी कापूस येऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला. परंतु कापूस खरेदी केंद्र पणनने सुरू केले नाही. त्यामुळे दिवाळी सणही शेतकºयांना आर्थिक टंचाईतच साजरा करावा लागला. काही शेतकºयांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकला. परंतु त्यांना ३२०० ते ३६०० रुपये क्ंिवटल दराने भाव देण्यात आला. यातून शेतकºयांची चांगलीच लूट होत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी २ आॅक्टोबरला पणनचे कापूस केंद्र सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. परंतु आता आॅक्टोबर महिना संपत आला तरी दिग्रसमध्ये पणनचे केंद्र सुरू झाले नाही. तसेच नाफेडकडून सोयाबीन केंद्रही सुरू करण्यात आले नाही. कापूस व सोयाबीन केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, अरविंद मिश्रा, बाळू जाधव, राहुल देशपांडे, अभय जयस्वाल, मनोज बोराडे, विवेक राठोड यांच्यासह नगरसेवक केशव रत्नपारखी, संजय कुकडी, जिंक्य मात्रे, डॉ. संदीप दुधे, जिल्हा परिषद सदस्य हितेश राठोड, संजय इकडे, नितीन सोनुरकर, अजय भोयर, संदीप रत्नपारखी, राजू निरपासे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Start shopping of groceries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.