स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:11+5:30

स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले असावे, असे त्यावरील सही, शिक्क्यावरून स्पष्ट होते. जवळपास शंभरच्यावर फॉर्म बेवारस फेकून देण्यात आले होते. या फॉर्मवर महिलांचे फोटो लागलेले होते.

State Bank account holders' documents were thrown unattended in the post ground | स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

Next
ठळक मुद्देबँक एजंटचा प्रताप । नागरिकांच्या सतर्कतेने शहर पोलिसांच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वसाधारण कुटुंबातील नागरिकांचे बँक खाते उघडण्याचे फॉर्म मूळ कागदपत्रासह यवतमाळातील पोस्टल मैदानावर बेवारस पडलेले आढळले. हा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याने बेजबाबदारपणे खाते उघडण्याचे फॉर्म त्याला लागलेल्या मूळ कागदपत्रांसह फेकून दिले. सूज्ञ नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी हे कागदपत्र ताब्यात घेतले.
स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले असावे, असे त्यावरील सही, शिक्क्यावरून स्पष्ट होते. जवळपास शंभरच्यावर फॉर्म बेवारस फेकून देण्यात आले होते. या फॉर्मवर महिलांचे फोटो लागलेले होते.
त्यांचे आधार कार्ड व इतर महत्त्वाचे दस्ताऐवज त्याला जोडले होते. या सर्व दस्ताऐवजांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता होती. ज्या एजंटने हे फॉर्म खाते उघडण्यासाठी घेतले त्या एजंटने ते फॉर्म बँकेत जमाच केले नसल्याचे दिसून येते.
त्यांचे हे फॉर्म मूळ दस्ताऐवजासह बेवारस पडून असल्याचे सांगितले असता त्यांनीही चिंता व्यक्त केली. संबंधित एजंटवर कारवाई होणे अपेक्षित आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.

कागदपत्राचा गैरवापर होऊन फसवणुकीचा धोका
बँक खात्याशी संबंधित इत्यंभूत माहिती असलेले दस्तावेज बेवारस फेकून दिले. स्टेट बँके सारख्या जबाबदार बँकेच्या एजंटकडून हा गंभीर प्रकार घडला. यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका वाढला आहे. सध्याच्या काळात आॅनलाईन फसवणुकीचे गुन्हे सतत वाढत आहे. एक साधा ओटीपी बँकेच्या खात्यातील पैशावर डल्ला टाकण्यासाठी पुरेसा आहे. पोस्टल मैदानावर आढळलेल्या बँक खात्याच्या फॉर्मसोबत ग्राहकाचे सर्वच डिटेल्स जोडलेले कागदपत्र होते. एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हाती हे दस्तावेज लागले असते तर त्या सामान्य ग्राहकांच्या खात्यातील रक्कम धोक्यात आली असती. अशा स्थितीत बँक ग्राहकाला संरक्षण देण्याऐवजी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

बँक खाते उघडण्यासाठी एजंटकडे दस्तावेज व फोटो दिले होते. आता आमचे बँक खाते उघडले असून व्यवहारही सुरू आहे. कागदपत्र बेवारस फेकल्याबाबत माहिती नाही. असे झाले असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
- मनोज गावंडे, ता. तुपटाकळी ता. दिग्रस (एसबीआयचे ग्राहक)

Web Title: State Bank account holders' documents were thrown unattended in the post ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.