जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाºयांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 09:28 PM2017-09-21T21:28:20+5:302017-09-21T21:28:37+5:30

जिल्हा परिषदेत अधिकाºयांची वानवा निर्माण झाली असून प्रभारावर गाडा हाकला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला रजेवर आहे.

State of the in-charge officers in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाºयांचे राज्य

जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाºयांचे राज्य

Next
ठळक मुद्देसीईओ रजेवर : एका अधिकाºयाकडे तीन पदे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेत अधिकाºयांची वानवा निर्माण झाली असून प्रभारावर गाडा हाकला जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला रजेवर आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांची बदली झाली होती. मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. तथापि रजेवर जाण्यापूर्वी सीईओंनी त्यांना कार्यमुक्त केले. परिणामी आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदांचा प्रभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
ठमके यांचीही बदली झाली. मात्र त्यांना कार्यमुक्त केले गेले नाही. आता ते चक्क तीन मुख्य पदांचा कार्यभार वाहात आहे. पंचायत व बांधकाम विभागही प्रभारावर आहे. सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांचीही बदली झाली आहे.
प्रभारामुळे गाडा पडला अडून
मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर अन् दुसºया क्रमांकाचे पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेचा गाडा अडून पडला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या दोन्ही पदांचा प्रभार वाहात आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे अडली. बदली होऊन असल्याने सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केवळ तनानेच हजर असतात. एकूणच बदली, प्रभार व वादाच्या पार्श्वभूमिवर अधिकाºयांमधील चैतन्य हरपल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा गाडा चिखलात रूतल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: State of the in-charge officers in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.