यवतमाळ जिल्ह्यातील ३९ राष्ट्रीय खेळाडूंना राज्य शासनाची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:50 PM2019-05-27T12:50:08+5:302019-05-27T12:50:40+5:30
जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील ३९ खेळाडूंनी सन २०१८-१९ या सत्रात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय शालेय स्पर्धेत विविध खेळात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. या राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख ४४ हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा गौरव केला.
राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त आणि सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक खेळाडूंना ११ हजार २५० रुपये, द्वितीय क्रमांक आठ हजार ९५०, तृतीय क्रमांक सहा हजार ७५०, तर सहभागाबद्दल तीन हजार ७५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील सात खेळाडूंनी विविध खेळात प्रथम, पाच खेळाडूंनी द्वितीय, तर सात खेळाडूंनी तृतीय क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्र संघाला पदक प्राप्त करून दिले. २० खेळाडूंनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभाग घेतला, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी दिली.
या खेळाडूंची शिष्यवृत्ती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. खेळाडूंशी संबंधित शाळेच्या शिक्षकांनी अर्ज व बँक पासबूकच्या झेरॉक्ससह कार्यालयात संपर्क करून शिष्यवृत्ती प्राप्त करून घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क करता येईल.
शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडू
१४ वर्षे वयोगट - हर्ष चव्हाण, सानिका रोकडे, अमन राजा, दीप गाबडा, अनुष्का नागरमोथे, मयांक काळे, प्रशांत चव्हाण, वृंदा सोनटक्के, खुशी जाधव, तनुश्री कडू, क्षितिज टोणे, कार्तिकी येंडे.
१७ वर्षे वयोगट - सायली वझाडे, इशाका पाटील, मानसी इखे, नंदिनी पाटील, आरोही भगत, अमितेश बोदडे, अभिलाष टेके, देवांशू बाळबुद्धे, तन्मय पुरके, स्वर पोतदार, तेजस भगत, अंजली गुप्ता, तन्मय पुरके, सेजल जाधव. १९ वर्षे वयोगट - रितेश राऊत, देवयानी नित, हर्षल धाबर्डे, साक्षी शिरसाट, प्राची सोनारकर, राज बागडिया, रेवती कोकरे, हर्षल खामनकर, यशस्विनी कुंथळकर, सुयोग मोरे, नीमिषा राजगुरे.