अमोलकचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:23 PM2018-02-16T23:23:25+5:302018-02-16T23:24:19+5:30
येथील अमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोमा सेन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील अमोलकचंद महाविद्यालयात ‘आंग्लभाषेतील संशोधनरीती’ याविषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोमा सेन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्रकाश चोपडा अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रेड्डी, चर्चासत्राचे आयोजक-सचिव प्रा.डॉ. विवेक विश्वरुपे व्यासपीठावर होते.
डॉ.शोमा सेन म्हणाल्या, भाषा आणि वाङ्मयातील संशोधनरीती एकूणच तंत्रशुद्ध, काटेकोर आणि नियमबाह्य आहे. वाङ्मयातील विशेषत: इंग्रजी वाङ्मयातील संशोधन कार्य करताना संशोधनकर्त्याने कालसुसंगतता आणि नाविण्य यावर भर देऊन दर्जेदार संशोधन करावे.
अध्यक्षीय भाषणात प्रकाश चोपडा यांनी बौद्धीक क्षेत्रातील संशोधनातील निष्कर्षांचा समाज जीवनातील सामान्य नागरिकांना उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. मिश्रा यांचेही यावेळी भाषण झाले. संचालन डॉ.सुनीता गुप्ता यांनी केले. स्वागतगीत डॉ. राहूल एकबोटे, स्वीटी जुळे व साहिल जुळे यांनी सादर केले.
यानंतरच्या सत्रात लातूर येथील प्रा.डॉ.अरविंद नवले यांनी ‘संशोधनामध्ये माहिती व संवाद तंत्राची उपयोगीता’ या विषयावर पॉवर पॉर्इंटच्या सहायाने सादरीकरण केले. यासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मिश्रा होते. नागपूर येथील प्राचार्य डॉ.ज्योती पाटील यांनी ‘मॉडर्न लँग्वेज असोसिएशन स्टाईलशीटची आठवी आवृत्ती : प्रबंधामध्ये महत्व’ या विषयावर व्याख्यान दिले. सहयोगी प्राध्यापक बिना राठी यांनी ‘प्रबंधाच्या संहितेचे कौशल्यपूर्ण संपादन’ याविषयावर सांगोपांग विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर होते.
समारोप सत्राचे अतिथी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी आपल्या भाषणातून इंग्रजी भाषेतील विपूल साहित्य संपदेचा आढावा घेतला. यासत्राचे अध्यक्ष डॉ. रेड्डी होते. चर्चासत्रातील नोंदणीकृत प्राध्यापक-शिक्षकांपैकी प्रा.विवेक देशमुख आणि उषा संजय कोचे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ. विवेक विश्वरुपे यांनी आभार मानले. आयोजनासाठी डॉ. प्रवीण जोशी, डॉ. विजेश मुणोत, प्रा.सुधीर त्रिकांडे, पंकज कांबळे, रवींद्र नांदूरकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.