दिग्रसच्या स्वस्त धान्य दुकानदारांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:43 AM2021-05-08T04:43:51+5:302021-05-08T04:43:51+5:30
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात रास्त भाव दुकानदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक दुकानदारांचा ...
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यात रास्त भाव दुकानदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक दुकानदारांचा मुत्यू झाला. रास्त भाव दुकानदारांना विमा नाही किंवा कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे धान्य वाटप करताना कार्डधारकाचा ई-पाॅस मशीनवर अंगठा घेताना संपर्क येतो. यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी कार्डधारकांची मोठी गर्दी होते. त्यात एखादा कोरोनाबाधित असल्यास तो इतरांच्या संपर्कात आल्यास दुसऱ्यांना कोरोना होऊ शकतो. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांना लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्डधारकाचे अंगठे ई-पाॅस मशीनवर न घेता धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार संजय राठोड यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रल्हाद कोरडे, फिरोज खान नुरखान, पुंडलिक इंगोले, हरिश उपलेंचवार, जे.एन. आडे, समीर पटेल, विनोद जाधव आदी उपस्थित होते.