ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:39 AM2021-04-19T04:39:00+5:302021-04-19T04:39:00+5:30
राज्यातील २७ हजार ९५० ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ६० हजार कर्मचाऱ्यांचा मागील २० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने ...
राज्यातील २७ हजार ९५० ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ६० हजार कर्मचाऱ्यांचा मागील २० वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. राज्य शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले गेले. मात्र, शासनाने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे १९ एप्रिल रोजी राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून, बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना संघटनेने निवेदन पाठविले. या आंदोलनात महागाव तालुका ग्रामपंचायत संघटना सहभागी आहे. संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी तालुकाध्यक्ष गजानन हरणे, उपाध्यक्ष देविदास कौडकर, सचिव सुभाष सेवकर, सुधीर कदम, स्वप्निल बेलखेडे, अशोक भुसारे, शेख एजाज, विनोद चौधरी, किरण चकोर आदींची उपस्थिती होती.