महामार्गावरील उभे डोंगर धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 05:00 AM2020-11-08T05:00:00+5:302020-11-08T05:00:02+5:30
महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते. रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील उभे असलेले डोंगर धोकादायक वाटत आहे. या डोंगराचे दगड केव्हाही कोसळण्याची आणि जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.
महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते. रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागात मात्र दरड कोसळणार नाही व कोसळली तरी त्याचा वेग कमी होईल, या दृष्टीने उभ्या डोंगराला ठिकठिकाणी खचके देण्यात आले आहे. तीच सावधगिरी या मार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकाॅन या कंपनीने इतर डोंगरांबाबत का घेतली नाही हा प्रश्नच आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन तेथून प्रवास करतात.
महागावपासून संथगती !
महागावपासून पुढे तुळजापूरपर्यंत रस्ते बांधकामाचा कंत्राट सद्भावना कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे काम अगदीच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महागावपासून पुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अथाॅरिटीचा ‘नो-रिस्पाॅन्स’
दिलीप बिल्डकाॅनचे सहायक महाव्यवस्थापक रामअवतार त्यागी यांच्याशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. महामार्गाच्या प्रकल्प संचालकांनी प्रकरण ऐकून घेतले. मात्र प्रतिक्रिया देणे टाळले.