दारव्हा येथे दोन लाखांची तूर चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:17 PM2019-05-15T22:17:04+5:302019-05-15T22:17:22+5:30
येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : येथील वखार महामंडळाच्या गोदामातून चोरट्यांनी तुरीचे तब्बल ८५ कट्टे चोरून नेले. ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ४२ क्विंटल ५० किलो वजनाच्या या तुरीची किंमत बाजारभावानुसार दोन लाख १२ हजार रुपये आहे.
शहरातील आर्णी मार्गावर वखार महामंडळाची गोदामे आहे. या गोदामात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी आपला शेतमाल साठवून ठेवला आहे. वखार महामंडळाच्या गोदामात आपला शेतमाल सुरक्षित राहतो, अशी शेतकरी व व्यापाºयांची समजूत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी व व्यापारी या गोदामात आपला मात्र सुरक्षितरित्या साठवून ठेवतात. मात्र आता याच गोदामात चोरी झाल्याने शेतमालाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गोदाम क्रमांक ५ च्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी तुरीचे ८५ कट्टे लंपास केले. सोमवारी रात्रपाळी दरम्यान पोलिसांची गस्त आणि वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात चौकीदार असतानासुद्धा चोरीची एवढी मोठी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी महामंडळ कर्मचाºयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेतमाल निघाल्यानंतर मालाला योग्य भाव मिळत नसल्याने बाजारात तेजी येईपर्यंत शेतकरी व व्यापारी भाडे भरून गोदामात शेतमाल ठेवतात.
ती तूर आर्णीच्या व्यापाऱ्याची
गोदाम क्रमांक पाचमध्ये नाफेडसह शेतकरी आणि व्यापाऱ्यांची तूर साटवून आहे. चोरीस गेलेली ती तूर चव्हाण प्लायवूड आर्णी यांच्या नावाने ठेवलेली आहे. तूर चोरताना काही पोते फाटल्याने गोदामापासून काही अंतरावरपर्यंत तूर सांडून होती. त्यामुळेच ही घटना उघडकीस आल्याचे सांगितले जाते. दरम्यान, चोरट्यांनी केवळ तीच तूर चोरून नेली. इतर शेतकरी व व्यापाºयांची तूर मात्र तूर्तास सुरक्षित असल्याचे वखार महामंडळाकडून सांगितले जाते.