दुचाकी चोरल्या अन् जंगलात खड्डा करून पुरल्या;  चोरीची दुचाकी विकताना सापडला जाळ्यात

By विशाल सोनटक्के | Published: November 3, 2023 05:56 PM2023-11-03T17:56:41+5:302023-11-03T17:57:37+5:30

चार मोटारसायकली जप्त

Stolen the bike and buried it in the forest; Four motorcycles seized | दुचाकी चोरल्या अन् जंगलात खड्डा करून पुरल्या;  चोरीची दुचाकी विकताना सापडला जाळ्यात

दुचाकी चोरल्या अन् जंगलात खड्डा करून पुरल्या;  चोरीची दुचाकी विकताना सापडला जाळ्यात

यवतमाळ : यवतमाळ तसेच राळेगाव परिसरातून चार दुचाकी चोरुन लोहारा भागातील घनदाट जंगलामध्ये खड्डा खोदून त्यात गाड्या लपविणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई राळेगाव पोलिस पथकाने केली.

संतोष नामदेव वाघमारे रा. झाकीर हुसेन काॅलनी वर्धा याने २ नोव्हेंबर रोजी राळेगाव पोलिस ठाण्यात आपली दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिली. ३१ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह परिसरात दुचाकी उभी केली असता ती चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणी राळेगाव ठाण्यात वाहन चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान लोहारा परिसरात चोरीस गेलेल्या वर्णना प्रमाणे मोटारसायकल घेऊन एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले.

सुमित निरंजन भगत (३०) रा. नांझा ता. कळंब ह.मु. पिवळी नदीजवळ नागपूर असे या भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. पथकाने पोलिस खाक्या दाखविताच सुमित भगत याने राळेगाव व यवतमाळ परिसरातून आणखी चार दुचाकी चोरल्याची आणि त्या लोहारा परिसरातील जंगलात एका खड्ड्यामध्ये पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून या चारही दुचाकी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव, पोलिस अमलदार गोपाल वास्टर, सुरज चिव्हाणे, सुरज गावंडे, विशाल कोवे आदींनी केली.

सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी एमएच-२९-क्यू-२४५९, एमएच-३२-एम-३५९८, एमएच-३२एयू-६५०३ व अन्य एक मोपेड गाडी असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या भामट्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Stolen the bike and buried it in the forest; Four motorcycles seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.