पुसद तालुक्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 09:56 PM2018-10-20T21:56:21+5:302018-10-20T21:57:10+5:30
तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात अल्प पावसाने कापूस, सोयाबीन पीक हातचे गेले. सोबतच विविध किडींनी आक्रमण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात अल्प पावसाने कापूस, सोयाबीन पीक हातचे गेले. सोबतच विविध किडींनी आक्रमण केले. आता शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकºयांना प्रतिहेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करावी या मागणीसाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी शासन शेतकºयांप्रति उदासीन असल्याचा आरोप केला. येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकºयांसह रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
यात काँग्रेसचे नगरसेवक साकीब शाहा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास लांडगे, तालुकाध्यक्ष प्रेमराव सरगर व कार्यकर्त्यांचा समावेश होता. काही वेळानंतर सर्व आंदोलनकर्त्यांना सोडून देण्यात आले.