नेर येथे शेतकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:11 PM2017-10-23T22:11:45+5:302017-10-23T22:12:01+5:30

येथील बाजार समितीत व्यापाºयांनी सोयाबीनचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी नेर बाजार समितीसमोर तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नेर-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Stop the road from farmers to Nair | नेर येथे शेतकºयांचा रस्ता रोको

नेर येथे शेतकºयांचा रस्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देदोन तास ठिय्या : व्यापाºयांची मनमानी थांबविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : येथील बाजार समितीत व्यापाºयांनी सोयाबीनचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी नेर बाजार समितीसमोर तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नेर-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी व्यापाºयांची मनमानी थांबविण्याची मागणी शेतकºयांनी केली.
दिवाळी संपूनही शासनाने नाफेडमार्फत खरेदी सुरु केली नाही. त्यामुळे नेर बाजार समितीत व्यापारी शेतकºयांचा माल कवडीमोल भावाने घेत आहे. सोमवारी शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. हमीभाव ३०५० असताना व्यापाºयांनी १७०० ते २३०० दराने सोयाबीनची खरेदी सुरु केली. यातच शेतकºयांच्या शेडमध्ये व्यापाºयांचा माल असल्याने शेतकºयांचा उद्रेक झाला. शेतकºयांनी बाजार समितीसमोरील यवतमाळ-नेर मार्गावर रास्तारोको केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तहसीलदार अमोल पोवार, सहायक निबंधक कुमरे, ठाणेदार अनिल किनगे यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. उद्यापासून नाफेडची खरेदी सुरु होईल. व्यापाºयांना योग्य दर देऊ, व्यापाºयांचा शेडमधील माल बाहेर काढू, असे आश्वासन बाजार समितीच्या संचालकांनी दिले. त्यामुळे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाला माजी आमदार विजयाताई धोटे व शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी भेट दिली. यावेळी युवा संघर्ष समितीचे जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, गोपाळ चव्हाण, गौरव नाईकर, सतीश चवात, अंकुश राऊत, किशोर अडसोड, श्रीकांत ठाकरे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

नेर बाजार समितीत व्यापारी संगनमत करून शेतकºयांना लुटत आहेत. हा प्रकार थांबविण्यासंदर्भात आम्ही आता रस्त्यावर उतरु.
- निखिल जैत,
जिल्हा परिषद सदस्य.

Web Title: Stop the road from farmers to Nair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.