यवतमाळात शेतकºयांचा रस्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:24 PM2017-10-26T23:24:56+5:302017-10-26T23:25:07+5:30
येथील बाजार समिती संचालक आणि व्यापाºयांमध्ये अंतर्गत धुसफुसीवरून लिलाव थांबल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी रस्ता रोको आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बाजार समिती संचालक आणि व्यापाºयांमध्ये अंतर्गत धुसफुसीवरून लिलाव थांबल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी रस्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीसमोर धामणगाव रोडवर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. यावेळी सरकार व व्यापाºयांविरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
शेतमाल विक्रीसाठी गत तीन दिवसांपासून शेतकरी येथे मुक्कामी आहेत. आवक वाढल्याचा फायदा घेत व्यापाºयांनी भाव पाडले. पडलेल्या किंमतीतही शेतमाल विकण्याची तयारी शेतकºयांची आहे. यासाठी शेतकरी उघड्यावर माल टाकून मुक्कामी आहे. दरम्यान बुधवारी एका संचालकाने व्यापाºयांना शिवीगाळ केल्याचे हास्यास्पद कारण पुढे करण्यात आले. त्यावरून गुरूवारी व्यापाºयांनी सोयाबीनचा लिलावच थांबविला. याचा जाब विचारणाºया शेतकºयांना व्यापाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. यातून प्र्रकरण चिघळल्याने संतापलेल्या शेतकºयांनी रस्त्यावर उतरले. यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक आंदोलनामुळे ठप्प झाली होती.
शेतकºयांचा रूद्रावतार बघून बाजार समिती प्रशासन व व्यापारी ताळ््यावर आले. या वादात मध्यस्थी करण्यासाठी एसडीओ स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, सहाय्यक निबंधक अर्चना माळवी आंदोलन स्थळी आले. त्यांनी शेतकºयांना दोन तासात खरेदी सुरू करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला. नंतर व्यापाºयांचे प्रतिनिधी विजय मुंधडा, सभापती रवींद्र ढोक, उपसभापती गजानन डोमाळे यांची संयुक्त बैठक झाली. त्यात स्वतंत्र बैठक बोलावून नियोजन करण्याचे ठरविले. त्यावरून व्यापाºयांनी लिलाव सुरू करण्याचे मान्य केले. यावेळी शहरचे ठाणेदार यशवंत बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, होम डीवायएसपी तामगाडगे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
धामणगाव मार्ग तीन तास बंद
शेतकºयांनी व्यापाºयांची मनमानी व बाजार समिती प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरूद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. टायर जाळून, रस्त्यावर पाईप आडवे टाकून रस्ता रोको केला. शेतकºयांचा संताप बघून पोलिसांनाही सामंजस्याची भूमिका घेणे भाग पडले. या आंदोलनामुळे धामणगाव मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.
सोयाबीन उघड्यावर, शेतकरी मुक्कामी
बाजार समितीत सोयाबीन उघड्यावर आहे. पाऊस आल्यास ते पूर्णत: वाहून जाण्याची भीती त्यांना सतावत आहे. या स्थितीत व्यापारी व बाजार समिती प्रशासन अंतर्गत कुरापती काढण्यात व्यस्त असल्याने शेतकºयाचा संताप अनावर झाला होता. सोयाबीन विकण्यासाठी अनेक शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत मुक्कामी आहे.