घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: May 5, 2017 02:13 AM2017-05-05T02:13:12+5:302017-05-05T02:13:12+5:30
तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
घाटंजी : तालुका काँग्रेस कमिटी व शेतकरी वारकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र व केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार शेतकरी बांधवांनी डाळवर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली व निसर्गानेसुद्धा साथ दिली. त्यामुळे तुरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. पण शासन आता तूर घ्यायला तयार नाही. शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करावी, अन्यथा शेतकऱ्यांजवळ बँकेचे हप्ते भरण्यासाठीसुद्धा पैसे नाही त्यामुळे बँक कर्ज देणार नाही आणि ६० टक्के शेती पडिक राहण्याची दाट शक्यता आहे, याची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. विजय कडू, किशोर दावडा, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गावंडे, चिंतामण पायगान, अनुप चव्हाण, मनोज राठोड, राजू निकोले, राजू वातीले, ओंकार जिद्देवार, विजय देवतळे, अशोक भुतडा, बबलू राठोड, उमेश कोरोते, संतोष मेश्राम, मिलन मेश्राम, संतोष गेडाम, नितेश जामडे, गणेश उन्नरकर आणि तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)