यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:48 PM2018-12-10T23:48:10+5:302018-12-10T23:48:58+5:30
येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा निषेध नोंदवित सखोल चौकशीची मागणी केली.
अंबरनाथ येथील कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त कमी होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. हा हल्ला घडविण्यामागे असलेल्या सूत्रधाराचा शोध घ्यावा, अन्यथा रिपाइंतर्फे उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर तायडे, विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, महासचिव गोविंद मेश्राम, जिल्हा प्रवक्ता नवनीत महाजन, युवक जिल्हा अध्यक्ष अश्वजित शेळके, रामदास बनकर, धर्मपाल माने, सुखदेवराव जाधव, धर्मराज गायकवाड, करुणा शिरसाट, कल्पना मेश्राम, डी.के. हनवदे, गोलू खंडारे, अॅड. धनंजय मानकर, भारत खंडारे, अमोल सावळे, युवराज कांबळे, सुनील पदोडे, बाल आघाडीचे नेते मानव महाजन आदी उपस्थित होते.