बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाईव्ह लोकेशन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:00 AM2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:18+5:30
दुसऱ्या गावावरून येणारी एसटी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन त्यावरून पाहायला मिळणार आहे. या एसटीची गती तासी किती आहे त्यानुसार एसटी किती किलोमीटर अंतरावर आहे हे कळण्यास मदत होणार आहे. यातून प्रवाशांना आपला वेळ वाचविता येणार आहे. याशिवाय चालकांकडून अनेकवेळा वेळेचा दुरुपयोग होता. हा दुरुपयोगही या आधुनिक पद्धतीमुळे थांबविता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गाव तिथे एसटी असे एसटीचे ब्रीद वाक्य आहे. हात दाखवा एसटी थांबवा म्हणत प्रत्येक गावातील प्रवासी शहरापर्यंत आणण्याचे काम एसटी महामंडळ करते आहे. आता या एसटीला काळानुसार गती देण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी एसटी माॅडर्न झाली आहे. त्याला ट्रॅकिंग सिस्टिमने जोडले जात आहे.
यामुळे दुसऱ्या गावावरून येणारी एसटी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन त्यावरून पाहायला मिळणार आहे. या एसटीची गती तासी किती आहे त्यानुसार एसटी किती किलोमीटर अंतरावर आहे हे कळण्यास मदत होणार आहे. यातून प्रवाशांना आपला वेळ वाचविता येणार आहे. याशिवाय चालकांकडून अनेकवेळा वेळेचा दुरुपयोग होता. हा दुरुपयोगही या आधुनिक पद्धतीमुळे थांबविता येणार आहे.
गाडीची स्पीड, लोकेशनही कळणार
- यवतमाळ जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये आधुनिक स्वरूपाची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.
- प्रायोगिक तत्त्वावर त्याची पाहणी करण्यता येत आहे. या पद्धतीत बसस्थानकावर स्क्रीनही लावली जाणार आहे.
- प्रवाशाला ज्या गावास जायचे आहे त्या गावची बस स्थानिक बसस्थानकावर पोहोचण्यास किती वेळ आहे याचे लोकेशन स्क्रीनवर मिळणार आहे.
बसस्थानकात लागणार मोठे स्क्रीन
- महामंडळाच्या नऊही आगारांमध्ये मोठे स्क्रीन लागणार आहे. या ठिकाणी गाडीचे लोकेशन कळेल.
- जिल्ह्यातील ४०८ एसटी बसेसला ट्रॅकिंग सिस्टिम बसविली जात आहे. त्या दृष्टीने परिवहन महामंडळाने युद्ध पातळीवर कामकाज सुरू केले आहे.
- लवकरच सिस्टिम सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पित केली जाणार आहे. यामध्ये एसटी बस कुठल्या मार्गावर किती अंतरावर आहे याची माहिती प्रवाशांना कळणार आहे.
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
- अनेक वाहनचालक वाहन चालविताना स्पीड लाॅक तोडून वेगाने गाडी चालवितात. अशावेळी एसटीची गती ट्रॅकिंग सिस्टिममुळे माहीत पडणार आहे. यातून अपघाताला टाळता येणार आहे.
- अनेक चालक काही स्टाॅपवर वाटेल तेवढा वेळ थांबलेले असतात. काही चालक आपल्या गावाला गाडी उभी करतात.
- यामुळे बसस्थानकावर गाडी पोहोचण्यासाठी नियोजित वेळेला थोडा वेळ लागतो. हे सर्व प्रकार ट्रॅकिंग सिस्टिममुळे उघड होणार आहेत.