चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले
By admin | Published: July 5, 2014 11:48 PM2014-07-05T23:48:59+5:302014-07-05T23:48:59+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी शुक्रवारी चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
‘नरेगात’ भ्रष्टाचार : तक्रारीवर चौकशीशिवाय कामे सुरू
बाभूळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी शुक्रवारी चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
सदर ग्रामपंचायतीत २०१२-१३ मध्ये ‘नरेगा’ अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली. यामध्ये चोंढी ते करळगाव शिव पांदण रस्त्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात सदर रस्ता झालाच नाही. तरीही ४ फेबु्रवारी २०१२ ते १३ मे २०१४ या कालावधीत चार लाख ९५ हजार ६०० रुपयांचे काम कागदोपत्री दाखविण्यात आले. कामाशिवाय निधी लाटण्यात आला. सरपंच, सचिव, पोस्टमास्तर, कनिष्ठ शाखा अभियंता यांनी संगणमत करून हा निधी हडप केला. याविषयीची तक्रार करूनही चौकशी झाली नाही.
सदर प्रकाराची माहिती २७ जूनला बाभूळगाव तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिली होती. चौकशी न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याच्या इशारा त्यावेळी दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने कार्यालयाला कूलूप ठोकून ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी उपसरपंच नीलेश कदम, ग्रामपंचायत सदस्य डॉ.अशोक राऊत, गुलाब गाडेकर, अरविंद भोसले, कमला राजूरकर, आशा कोहरे, नंदा नाईक, लता माने, सुमित्रा बारबुधे, माधुरी मोहिते, विनोद पिंपळकर, पंचफुला राजुरकर, कामिनी कदम, भावना वाडेकर, फुला वाडेकर, वच्छला बोडेकर, प्रतिभा काळे, अंजना कोहरे, उषा उगले, रायजा मांगुळकर, निर्मला खंडागळे, देवकी कोहरे, सिंधू महाडिक, इंदिरा परागे, रेखा जाधव, प्रभाकर ठक, सुवर्णा भोसले, बेबी ठक, विनायक मांगुळकर, पैकू वाडेकर, संजय मोहिते, माला डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)