करंजीच्या सचिवाचा अजब कारभार, कामे न करता काढली देयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:28+5:302021-04-16T04:42:28+5:30

याप्रकरणी जिल्हास्तरीय चौकशी नेमून झालेल्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करून दोषींकडून वसुली करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली. शासनाने ग्रामपंचायतीचा कार्यभार ...

Strange affair of Karanji's secretary, payments made without work | करंजीच्या सचिवाचा अजब कारभार, कामे न करता काढली देयके

करंजीच्या सचिवाचा अजब कारभार, कामे न करता काढली देयके

Next

याप्रकरणी जिल्हास्तरीय चौकशी नेमून झालेल्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करून दोषींकडून वसुली करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली. शासनाने ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळण्यासाठी आपले प्रतिनिधी नेमले. त्यांच्याच हातात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या चाव्या दिल्या. मात्र, कुंपणच शेती खात असल्याची स्थिती या महाघोटाळ्याच्या तक्रारीवरून दिसून येत आहे.

सचिवाने ग्रामपंचायतीची ई लाईंचे अर्धवट काम सोडून पूर्ण बिले काढली आहेत. मोटारपंपाला लोखंडी पाइप न लावता पाइपाचे बिल काढले. शाळेच्या शौचालयाचे जुने बांधकाम दाखवून नवीन बिल काढण्यात आले. शाळेत फर्निचर आणले नसतानाही ६५ हजारांचे बिल काढले. अंगणवाडीतील चिमुकल्यांना ड्रेस घेतले नाहीत, तरीसुद्धा बिल काढले. अंगणवाडीत ओटा न बांधता त्याचेही बिल काढले. वॉटर फिल्टर चालू न करताच दुरुस्तीचे बिल काढण्यात आले. गुरांसाठी बांधलेल्या पाण्याच्या सिमेंट टाकी हौद जाणून-बुजून फोडून दुसरा खरेदी करण्यात आला. यात सचिवाने ग्रामपंचायतीचे नुकसान केले. वाॅटर फिल्टरकरिता आलेले वाल कंपाउंडचेही बिल काढले. असे अनेक देयके काढल्याने हा घोटाळा संगनमताने झाल्याची शंका तक्रारीतून व्यक्त करण्यात आली आहे.

बॉक्स

समाजमंदिराची दुरुस्ती न करताच बिल अदा

गावात दलित वस्तीमधील समाजमंदिराच्या दुरुस्तीचे कोणते काम न करताच बिल काढण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम न करता बिल काढण्यात आले. विद्युत लाइट न लावता बिल काढण्याचा संबंधितांनी प्रकार केला. सचिवाने केलेल्या या महाघोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी करंजीवासीयांनी केली आहे.

Web Title: Strange affair of Karanji's secretary, payments made without work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.