आक्षेपार्ह मजकुरावरून यवतमाळात तणाव

By admin | Published: November 16, 2015 02:14 AM2015-11-16T02:14:57+5:302015-11-16T02:14:57+5:30

फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील शारदा चौकात रास्ता रोको करून निषेध केला.

Stress in Yavatmal from objectionable text | आक्षेपार्ह मजकुरावरून यवतमाळात तणाव

आक्षेपार्ह मजकुरावरून यवतमाळात तणाव

Next

टायर पेटविले : शारदा चौकात रास्ता रोको
यवतमाळ : फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील शारदा चौकात रास्ता रोको करून निषेध केला. या वेळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेले शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरली. यामुळे नागपूर व पांढरकवडा मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा शहर पोलीस ठाण्याकडे वळविला. येथे शहेबाज खान शफी उल्ला खान यांनी तक्रार दिली. या तक्रारीनुसार पीयूष बाथम, भैय्यासाब हिमांशू सिंग आणि मनीष दत्ता या तिघांनी फेसबुकवर मजकूर पोस्ट केला.
त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोस्ट करणारे हे तिघे आरोपी नेमके कुठले आहे याचा शोध पोलीस घेत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाहतूक सुरळीत झाली आहे.

Web Title: Stress in Yavatmal from objectionable text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.