महिलांचा कामासाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:37 PM2019-02-01T23:37:32+5:302019-02-01T23:39:20+5:30
हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांच्या कक्षात ठिय्या दिला. काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी त्यांचा कक्ष सोडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : हाताला काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही व्यथा ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी नेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडून त्यांच्या कक्षात ठिय्या दिला. काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी त्यांचा कक्ष सोडला.
ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील नागरिकांनी जॉबकार्ड काढले आहे. मनरेगा अंतर्गत कामे मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. सन २०१८ पासून कामाची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र सरपंच आणि सचिवांनी थातूरमातूर उत्तरे देऊन पळवाट काढली.
गावात कामे नसल्याने इतर ठिकाणी कामाचा शोध घ्यावा लागत आहे. त्यासाठीही भटकंती सुरू आहे. नियमित काम लागत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीत मनरेगाची कामे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी काम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी चंदा गवई, विमल चव्हाण, सुजाता बन्सोड, सुनीता राऊत, सीमा सोनवणे, शशीकला कांबळे, संजीवनी सोनोने, मंदा राऊत, अर्चना राऊत, माधुरी पुराम, रेखा वाघमारे, नीता सहारे, कविता बोंडे, नानूबाई सहारे, देवना गजबे, सुरेखा सहारे, उषा राठोड, शांताबाई राठोड, पंचशीला वासनिक, नंदा बन्सोड, दीक्षा शेंडे, महानंदा मरसकोल्हे, कविता ठाकरे, मंगला बनकर, कविता बागडे, कांता राऊत, चंद्रकला सोनोने, मंगला मडावी, सुनीता भिसे, करुणा येसने आदींची उपस्थिती होती.