नेर पोलीस ठाण्यावर जमाव धडकला
By admin | Published: July 5, 2015 02:21 AM2015-07-05T02:21:18+5:302015-07-05T02:21:18+5:30
आॅटोरिक्षातून अपहरण करून शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी नेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला.
नेर : आॅटोरिक्षातून अपहरण करून शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी नेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता शाळेतून घरी परतत असलेल्या आठवीतील बालिकेला मधुकर खंडागळे याने आॅटोने आजंती शिवारात नेले. तेथ तिच्यावर अत्याचार करण्यात आला. शुभम माहूरकर, मोहन पंचबुद्धे, मुकेश ऊर्फ मुक्या मेश्राम यांनी त्याला मदत केली. बालिका वेदनेने विव्हळत असतानाही त्यांनी एका ढाब्यावर जेवण घेतले. यानंतर तिला गावात आणून सोडण्यात आले.
घरी पोहोचलेल्या बालिकेची परिस्थिती गंभीर असल्याने आई-वडिलांकडून चौकशी सुरू झाली. झाला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावरून सदर चारही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. मुकेश ऊर्फ मुक्या मेश्राम आणि मोहन पंचबुद्धे यांना अटक करण्यात आली. मात्र दोघे फरार झाले. या दोघांनाही अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी जमाव पोलीस ठाण्यावर धडकला. ठाणेदार गणेश भावसार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.नाजूक धांदे, बापुराव रंगारी, सुरज वासनिक, अंकुश रामटेके, महेंद्र रामटेके, सिद्धार्थ मिसळे, राहुल मिसळे, संभा मिसळे, विनोद रंगारी, प्रकाश भोयर, अशोक फुलझेले, संतोष मिसळे, राहुल तायडे, सरफराज खान, फिरोज खान आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)