वादग्रस्त ठाणेदारांच्या बदलीसाठी ढाणकीत कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:29 PM2023-12-01T16:29:28+5:302023-12-01T16:30:45+5:30

व्यापाऱ्यांचा स्वयंस्फूर्त सहभाग, सर्वपक्षीय नेत्यांचा उपोषणाचा इशारा.

Strict shutdown for transfer of controversial Thanedars in yavatmal | वादग्रस्त ठाणेदारांच्या बदलीसाठी ढाणकीत कडकडीत बंद

वादग्रस्त ठाणेदारांच्या बदलीसाठी ढाणकीत कडकडीत बंद

उदय पुंडे,यवतमाळ : वादग्रस्त ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या बदलीसाठी शुक्रवारी शहरात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.ढाणकी शहर व परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून यावर लगाम लावण्यास ठाणेदार अकार्यक्षम ठरल्या आहेत. तसेच या धंद्यांना त्यांनी संमती दिल्याने परिसरामध्ये जुगार व इतर अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. बिटरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत अराजकता वाढली असून पोलिसांचा वचक नाही. ठाणेदार व त्यांचे पती हे फक्त माया जमवण्यातच व्यस्त असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 

ढाणकी शहरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व नागरिकांनी पोलिस अधीक्षकांना २३ नोव्हेंबर रोजी ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या बदलीसंदर्भात निवेदन दिले होते. त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली होती. निवेदनामध्ये ठाणेदार यांची बदली न झाल्यास १ डिसेंबर रोजी ढाणकी बंदची हाक देण्यात आली होती. अद्यापही ठाणेदारांची बदली न झाल्याने शुक्रवारी ढाणकीत कडकडीत बंद पाळण्यात आला. ठाणेदारांच्या कार्यप्रणालीचा निषेध करण्यात आला. यावेळी शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. 

ठाणेदार सुजाता बनसोडे यांच्या बदलीची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. बदलीसाठी साखळी उपोषणसुद्धा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय कुंभरवार, मनसे तालुका अध्यक्ष सादिक शेख, नगरपंचायत उपाध्यक्ष शेख जहीर जमीनदार, खरेदी- विक्री संघ उपाध्यक्ष गणेशराव नरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष भास्कर चंद्रे पाटील, प्रहार तालुका प्रमुख सय्यद माजीद, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल तुपेकर, व्यापारी महासंघ तालुकाध्यक्ष रूपेश भंडारी, वंचित बहुजन आघाडी महासचिव जॉन्टी विनकरे, भीम टायगर सेना जिल्हा उपाध्यक्ष करण भरणे, युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर, नगरसेवक उमेश योगेवार, साई मंतेवाड, कृष्णा मुखिरवाड, सुनील कदम, सय्यद तोसिफ, कांता वासमवार आदी उपस्थित होते.

Web Title: Strict shutdown for transfer of controversial Thanedars in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.