नियमांची कठोर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:00 AM2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:15+5:30
कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी भवन, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. किन्हीवळगी येथील रेशीम उद्योगाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कोरोनाच्या नवीन विषाणूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
तालुक्यात मॅरेथॉन दौरा केल्यानंतर येथील तहसील कार्यालयात सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, तहसीलदार सुभाष जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड, बीडिओ राजीव शिंदे, ठाणेदार सुरेश मस्के, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.पी. राठोड, सहाय्यक निबंधक बी.जी. जाधव आदीसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कोविड लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या, तसेच प्रशासकीय कामकाजाची गती वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सुरुवातीला त्यांचे जांभोरा येथे आगमन झाले. तेथे महिला बचत गटाने सुरू केलेल्या उद्योगाची त्यांनी पाहणी केली. नंतर लाडखेड प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, तलाठी भवन, बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. किन्हीवळगी येथील रेशीम उद्योगाची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तसेच लसीकरणाबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. रुग्णांची विचारपूस केली.
नगरपरिषदेच्या घनकचरा जागेची पाहणी केली. नव्याने बांधण्यात येत असल्याने प्रशासकीय भवन स्थळाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने प्रशासन चार्ज
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी तालुक्यातील अनेक गावे आणि कामांना भेट दिली. कोविडसह इतर प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे प्रशासन चार्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. मधल्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने काहीशी शिथिलता मिळाली होती. आता मात्र नियमांच्या पालनासाठी प्रयत्न होईल. लसीकरण वाढेल. मरगळ झटकून प्रशासकीय कामांना गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.