एसटीच्या विलिनीकरणासाठी ‘संघर्ष’ तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:28 PM2018-03-20T23:28:16+5:302018-03-20T23:28:16+5:30

तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे.

The 'struggle' for the merger of ST is intense | एसटीच्या विलिनीकरणासाठी ‘संघर्ष’ तीव्र

एसटीच्या विलिनीकरणासाठी ‘संघर्ष’ तीव्र

Next
ठळक मुद्देस्वेच्छामरण मागितले : राज्यपालांपर्यंत पोहोचले कामगारांचे अर्ज

ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. या माध्यमातून यवतमाळ आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राज्यपालांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
कमी वेतनामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. पाल्यांचे शिक्षण करताना आर्थिक अडचणी पुढे येत आहे. यातूनच कर्जाचा डोंगर वाढत आहे. महामंडळातील ९० टक्केपेक्षा अधिक कामगार वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करून राज्य सरकारी कर्मचाºयांप्रमाणे सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन जीवनदान द्यावे, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
आर्थिक ताणामुळे एसटी कामगारांनी आत्महत्या केल्याची घटना यापूर्वी घडली आहे. वारंवार निवेदने, मोर्चा, आंदोलने करूनही महामंडळाकडून वेतनवाढीविषयी प्रतिसाद मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे अडवणी वाढल्या आहे. यातून सुटका होण्यासाठी शासनात विलिनीकरण हा एकमेव पर्याय आहे. यवतमाळ आगारातील अनेक कामगारांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगीचे अर्ज राज्यपालांकडे पाठविले आहे. विलिनीकरणाचा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे सचिन गिरी यांनी सांगितले.

Web Title: The 'struggle' for the merger of ST is intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.