एसटीच्या ‘शिवशाही’चा बेरंग; अस्वच्छतेने प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:03 PM2018-08-29T13:03:17+5:302018-08-29T13:03:52+5:30

एसटीची ‘शिवशाही’ दिसताच आंदोलकही चार पावले मागे सरकून सन्मान करतात. मात्र एसटी महामंडळाने या बसच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. चिखलाने भरलेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत.

ST's 'Shivshahi' buses are in dirty condition | एसटीच्या ‘शिवशाही’चा बेरंग; अस्वच्छतेने प्रवासी त्रस्त

एसटीच्या ‘शिवशाही’चा बेरंग; अस्वच्छतेने प्रवासी त्रस्त

Next
ठळक मुद्देचिखलाने माखलेल्या बसेस रस्त्यावर

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एसटीची ‘शिवशाही’ दिसताच आंदोलकही चार पावले मागे सरकून सन्मान करतात. मात्र एसटी महामंडळाने या बसच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत. चिखलाने भरलेल्या बसेस रस्त्यावर धावत आहे. बसची अंतर्गत स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
महामंडळाची (एसटी) लालपरी आणि शिवशाही या बसेस नियमित स्वच्छ ठेवण्यात सातत्य अपेक्षित आहे. स्वच्छतेचा कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आला आहे. परंतु बहुतांश ठिकाणी यात हलगर्जीपणा केला जातो.
महामंडळाच्या मालकीच्या ५०० शिवशाही बसेस तर खासगी कंपनीच्या एक हजार बसेस आहेत. या बसेस वातानुकुलीत, आरामदायी आहेत. थांबेही कमी आहे. भाडे अधिक असले तरी बहुतांश नागरिकांचा याच बसने प्रवास करण्याकडे कल आहे. प्रवाशांना चांगली सेवा देणे महामंडळाची जबाबदारी आहे. खासगी ‘शिवशाही’ स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची तर, महामंडळाच्या बसेसची जबाबदारी एसटीची आहे. परंतु या दोन्ही संस्था स्वच्छतेबाबत कमालीच्या उदासीन आहेत.
शिवशाही आगारातून बाहेर पडण्यापूर्वी स्वच्छ असावी. आतमध्ये कुठेही कचरा नसावा, आसने ओली नसावी हा नियम आहे. खासगी शिवशाहीलाही हा नियम लागू आहे. परंतु बेरंग झालेल्या शिवशाही बसेस आज रस्त्यावर धावत आहेत. चिखलाने माखलेल्या, आतमध्ये अस्वच्छ असलेल्या, ओल्या झालेल्या सिटवर बसून प्रवास करताना नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

यवतमाळात ८१ हजारांचा दंड
बसच्या अस्वच्छतेबद्दल यवतमाळ आगाराने संबंधित कंपनीला मागील काही महिन्यात ८१ हजार रुपये दंड केला आहे. शिवशाहीसह विविध प्रकारच्या बसेसची थातुरमातूर स्वच्छता केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: ST's 'Shivshahi' buses are in dirty condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.