नव्या पोलीस भरतीबाबत विद्यार्थी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:18 PM2019-01-29T22:18:12+5:302019-01-29T22:19:08+5:30

पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. या मोचार्ने संपूर्ण वणी शहर दणाणून गेले. प्रा.डॉ.दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

Student aggressor for recruitment of new police | नव्या पोलीस भरतीबाबत विद्यार्थी आक्रमक

नव्या पोलीस भरतीबाबत विद्यार्थी आक्रमक

Next
ठळक मुद्देवणी शहरात मोर्चा : एसडीओंना निवेदन, ‘दणका मोर्चा’ काढण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. या मोचार्ने संपूर्ण वणी शहर दणाणून गेले. प्रा.डॉ.दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
पोलीस भरतीच्या प्रक्रियेत शारीरिक परीक्षेला महत्त्व देण्यात आले आहे. या परीक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी १५ उमेदवारांची निवड केली जाते. मात्र सध्या सरकार नवीन पोलीस भरतीच्या प्रक्रियेची तयारी करीत आहे. यात आधी लेखी परीक्षा घेतली जाणार व लेखी परीक्षा उतीर्ण केलेल्या उमेदवारांचीच शारीरिक परीक्षा घेतली जाणार. या प्रक्रियेमध्ये शारीरिक परीक्षेसाठी दोन-तीन वर्षांपासून मैदानावर सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. या नवीन भरती प्रक्रियेचा अद्याप शासकीय आदेश आला नसला तरी हे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. हा मोर्चा शासकीय मैदान ते शिवाजी चौक असा मार्गक्रमण करत या मोचार्चा शेवट तहसिल कार्यालयात झाला. तहसिल कार्यालयात हा निर्णय मागे घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. जर मागणीकडे दुर्लक्ष केल्यास दणका मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

Web Title: Student aggressor for recruitment of new police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस