आरक्षण कपातीविरोधात विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:45 PM2018-06-23T22:45:27+5:302018-06-23T22:46:27+5:30

केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे.

Student protested against reservation deductible | आरक्षण कपातीविरोधात विद्यार्थी संतप्त

आरक्षण कपातीविरोधात विद्यार्थी संतप्त

Next
ठळक मुद्देनिवेदन : वैद्यकीय प्रवेशात २७ ऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय वैद्यकीय समितीने ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २७ टक्केऐवजी २ टक्केच आरक्षण ठेवले. यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीत आले आहे. याविरोधात शनिवारी ओबीसी आरक्षण बचाव समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
वैद्यकीय शिक्षणाकरिता नियमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील १७७ महाविद्यालयांतील १५ टक्के राखीव जागांचे आरक्षण २ टक्क्यावर आणले आहे. उर्वरित जागा खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील ओबीसीची संख्या घटण्याचा धोका आहे.
१७७ वैद्यकीय महाविद्यालयात केंद्राच्या १५ टक्के आरक्षणानुसार ३,७११ जागा आरक्षित आहेत. ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणानुसार १००२ जागा ओबीसीसाठी आरक्षित ठेवणे आवश्यक होते. परंतु, देशभरातीत वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ७४ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. ही टक्केवारी १.८५ टक्के आहे. खुल्या प्रवर्गाकरिता २,८११ जागा सोडण्यात आल्या आहेत. यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशाला मुकणार असल्याचा आरोप ओबीसी आरक्षण बचाव समितीने केला आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कोट्यात १ टक्का आरक्षणही मिळाले नाही. राज्यातील २१ वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसींना आरक्षणच सोडले नाही, असा आरोप समितीने केला आहे. देशभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी आरक्षण बचाव समितीने दिला आहे.
निवेदन सादर करताना प्रदीप वादाफळे, डॉ. दिलीप घावडे, रमेश गिरोळकर, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, राहुल पाटील, जितेंद्र हिंगासपुरे, सुनिता काळे, वैशाली फुसे, अनिता गोरे, निता दरणे, कमल खंडारे आदी उपस्थित होते.

Web Title: Student protested against reservation deductible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.